logo
back-arrow
श्री. तुकाराम अशोक सोनावणे
नाशिक, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र/एकरः बागायती 8, जिरायती 2
display-image
तुकाराम सोनावणे हे एक व्यवसायाभिमुख शेतकरी आहेत. ते प्रत्येक हंगामामध्ये भाजीपाला व फळभाज्यांची पीके घेतात. दरवर्षी खरीप, रब्बी व उन्हाळी अश्या तिन्ही हंगामांमध्ये काकडीचे पीक घेत असतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये तापमान कमी झाल्यानंतर काकडी पिकाची वाढ खुंटते व फुलकळींची संख्या कमी होते. तसेच काकडी पिकावर रसशोषक किडी जसे मावा, फुलकिडे, तुडतुडे आणि त्यांच्यामुळे रोगाचा होणारा प्रादुर्भाव या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

चालू रब्बी हंमामामध्ये तुकाराम सोनवणे यांनी काकडीचे वाण - कावेरी व शिवालिका अश्या दोन जातींची निवड केली. काकडी बियाणे टोकण झाल्यापासून 10 दिवसांच्या अंतराने त्यांनी बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत प्रत्येकी 1 लि. 200 लि. पाण्यामध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्वारे 1 एकर क्षेत्रासाठी दिले.

त्याचबरोबर बायोफिट स्टिमरिच व बायो-99 च्या 15 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारण्या घेतल्या. त्यामुळे पिकाचे वेल अतिशय जोमाने वाढले, फुलगळ कमी झाली व फळांची संख्या वाढली. तसेच सरासरी पेक्षा काकडीची लांबी वाढली. फळाचे वजनही वाढून 180 ते 220 ग्रॅम मिळाले.

काकडी पिकावर येणारे रसशोषक किडींचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोफिट इन्टॅक्टच्या 20 दिवसांच्या अंतराने फवाण्या घेतल्या. त्यामुळे रासायनिक औषधांवरील खर्च कमी झाला.
पुर्वीचे काकडी पीक व बायोफिट काकडी पिकामधील फरक
पुर्वीचे काकडी पीक:
  • उत्पादन खर्च/एकरः रु.58,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 72 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.1600 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,15,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.57,000
बायोफिट कलिंगड पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 62,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 80 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.1800 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,44,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.82,000
चालू हंगामामध्ये त्यांना काकडीचा आकार, लांबी, रंग आणि फळावरील चकाकी यामध्ये त्यांना कमालीचा फरक दिसून आला. त्यामधून त्यांना काकडीचे 8 टन उत्पादन मिळाले.