logo
back-arrow
श्री. विठ्ठल भाऊसाहेब अनवट
नाशिक, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: बागायती - 3 एकर
display-image
श्री. विठ्ठल अनवट हे एक पदवीधर शेतकरी असून ते दरवर्षी टोमॅटोचे पीक घेतात. चालू वर्षी खरिप हंगामामध्ये त्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये (मेघदूत ढज-2048 जातीचे) टोमॅटोचे वाण निवडले होते. त्यांनी रोपांची लागवण जोडओळी पध्दतीने प्लास्टिक मंचिंगचा वापर करुन केली.

त्यांना टोमॅटो पिकाची विशेष काळजी घ्यावी लागत असे. कारण अतीवृष्टी किंवा ढगाळ वातावरणामुळे पिकावर येणारे रोग, फुलकिडे, नागअळी, फळे पोखरणारी आळी व कीड यांमुळे त्यांचे बरेच नुकसान होते. त्यामुळे बुरशीनाशक व किडकनाशकांवर खूप खर्च होत असे. रासायनिक औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे पिकाची नैसर्गिक प्रतिकारक्षमता, फळाची टिकवणक्षमता कमी होत असे.
या वर्षी श्री. अनवट यांनी बायोफिट उत्पादनांचा वापर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये केला. ठिंबक सिंचनाद्वारे त्यांनी बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत यांचा वापर 1 महिन्याच्या अंतराने दोन वेळा वापर केला. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास, अन्नघटकांची उपलब्धता वाढण्यास झाली. बुरशीजन्य, जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी बायोफिट रॅपअपची फवारणी 15 ते 20 दिवसांच्या अंतराने केली. त्यामुळे श्री. अनवट यांचा बुरशी नाशकांवरील खर्च कमी झाला.
पुर्वीचे टोमॅटो पीक व बायोफिट टोमॅटो पिकामधील फरक
पुर्वीचे टोमॅटो पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.84,000
  • सरासरी उत्पादनः 9.5 टन
  • बाजारभावः रु.15/किलो
  • एकूण उत्पन्न/एकरः रु.1,42,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.58,500
बायोफिट टोमॅटो पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.82,000
  • सरासरी उत्पादनः 12 टन
  • बाजारभावः रु.17/किलो
  • एकूण उत्पन्न/एकरः रु.2,04,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.1,22,000
रसशोषक किडीचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी बायोफिट इन्टॅक्टच्या 4 वेळा 15-20 दिवसांच्या अंतराने फवारण्या घेतल्या. त्यामुळे त्यांच्या किटनाशकावरील खर्च कमी झाला, टोमॅटो पिकाची गुणवत्ता सुधारली, फळांची टिकवण क्षमता वाढली. टोमॅटो पिकाच्या सुयोग्य वाढीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी त्यांनी बायोफिट स्टिमरीच व बायो-99 च्या फवारण्या 5 वेळा पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये केल्या. त्यामुळे चालू खरीप हंगामाध्ये त्यांना खूप छान उत्पादन मिळाले.