logo
back-arrow
श्री. दत्तात्रय भगवान गायकवाड,
सांगली, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : पेरू
एकूण शेती क्षेत्र : 10 एकर
display-image
श्री. दत्तात्रय भगवान गायकवाड हे आपल्या शेतामध्ये गेली 13 वर्षे वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन (उदा. टोमॅटो, झेंडू, ढबु मिरची, आले व ऊस) घेत आले आहेत. त्यांनी 2019-20 मध्ये पेरुची (बरफखाना) लागवड केली. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती मशागत केली तसेच शेणखत व रासायनिक खतांचा वापर केला.
बायोफिट उत्पादनांचा वापर : श्री. गायकवाड यांनी नेटसर्फच्या मार्गदर्शनानुसार पेरुच्या फळबागेतील 1.5 एकर क्षेत्रासाठी बायोफिटची जैविक कृषि उत्पादने वापरली. पेरूची रोपे लागणीच्या वेळेस त्यांनी बायोफिट स्टिमरिच व रॅपअपचा वापर केल्यामुळे रोपे चांगली रुजली. पेरूच्या रोपांना नवीन 3 ते 5 पानांचे फुटवे आल्यानंतर त्यांनी बायोफिट स्टिमरिच, बायो-99 व बायोफिट शेत यांच्या 20 ते 25 दिवसाच्या अंतराने 6 ते 7 फवारण्या घेतल्या. त्यामुळे पेरुच्या पिकाची योग्य वाढ होऊन पाने व फुटवे यांचा विकास झाला.
पुर्वीचे पेरू पीक व बायोफिट पेरू पिकामधील फरक
पुर्वीचे पेरू पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1.5 एकर : रु. 65 ते 80 हजार
  • सरासरी उत्पादन : 10 ते 12 टन
  • बाजारभावः रु. 15 प्रती किलो
  • निव्वळ नफा प्रति 1.5 एकर : रु.1 लाख 50 हजार सरासरी
  • जमिनीच्या पोता मधील बदल : रासायनिक खतांच्या वापराने जमीन टणक होती.
बायोफिट पेरू पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1.5 एकर : Rs. 65,000 to 70,000
  • सरासरी उत्पादन : 14 ते 15 टन
  • बाजारभाव : रु. 17 प्रती किलो
  • निव्वळ नफा प्रति 1.5 एकर : रु.1 लाख 60 हजार सरासरी
  • जमिनीच्या पोता मधील बदल : जमीन भुसभुशीत होऊन व गांडूळांची संख्या भरपूर वाढली.
त्याचप्रमाणे जास्तीत जास्त फुलकळ्यांचे रुपांतर फळांमध्ये झाली. बायोफिट NPK व बायोफिट शेत या उत्पादनांचा त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात वापर केला. त्यामुळे त्यांच्या रासायनिक खतांवर होणार्‍या खर्चामध्ये बचत झाली आणि सैंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. श्री गायकवाड यांना बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे यावर्षी 1.5 एकरातील 900 झाडांपासून, प्रत्येक झाडास सरासरी 15 ते 20 किलो पेरू याप्रमाणे एकूण 14 ते 15 टन फळ मिळाले. त्याचप्रमाणे त्यांना सरासरी रु. 17 प्र्रती किलो प्रमाणे बाजारभाव मिळाला.