logo
back-arrow
श्री. अनिल राजाराम येसुगडे
सांगली, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: 7 एकर बागायती
display-image
अनिल राजाराम येसुगडे हे गेल्या 8-10 वर्षांपासून द्राक्षाची शेती करत आहेत. त्यांच्याकडे द्राक्ष-माणिक चमण आणि सुपर सोनका अश्या दोन वाणांची शेती होते.

द्राक्ष हे एक संवेदनशील पीक असल्यामुळे वातावरणामधील झालेल्या बदलामुळे येणारे रोग उदा. डाऊनी व भुरी, करपा यांच्या नियंत्रणासाठी त्यांना दर 10-12 दिवसांनी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागत असे. तसेच पिकावर येणार्‍या किडी उदा. मिलीबग, कोळी, खोडकिडा, तुडतुडे, मावा इ. च्या नियंत्रणासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागत असे. रासायनिक खतांच्या आणि तणनाशकांच्या अती वापरामुळे जमिन कठिण बनली होती व जमिनीमधील मित्र किटक, जीवाणूंची संख्या कमी झाली होती.

चालू हंगामामध्ये, येसुगडे यांनी द्राक्ष पिकामध्ये बायोफिट एन.पी.के. व शेत यांचा प्रत्येक महिन्यातून एकवेळा वापर केला त्यामुळे जमिनीचा पोत सुधारला, जमिनीमधील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली व त्यांचा पिकाच्या वाढीवर सकारात्मक परिणाम झाला.

छाटणी नंतर व द्राक्ष मणी सेटींग झाल्यानंतर त्यांनी बायोफिट स्टीमरिच व बायो-99च्या 20 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारण्या घेतल्या. त्यामुळे द्राक्ष मण्यांची/घडाची वाढ चांगली झाली.
पुर्वीचे द्राक्ष पीक व बायोफिट द्राक्ष पिकामधील फरक
पुर्वीचे द्राक्ष पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.2,30,000
  • सरासरी उत्पादन टन/एकरः 12 टन
  • बाजारभाव/क्विंटलः रु.2800 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.3,36,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.1,06,000
बायोफिट द्राक्ष पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 2,20,000
  • सरासरी उत्पादन टन/एकरः 13.5 टन
  • बाजारभाव/क्विंटलः रु.3000 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.4,05,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.1,85,000
द्राक्ष पिकावर बुरशी येवू नये तसेच रसशोषक किडी येवू नयेत याकरिता येसुगडे यांनी बायोफिट रॅपअप व बायोफिट इन्टॅक्ट च्या दर 15-20 दिवसांच्या अंतराने फवारण्या घेतल्या.

त्यामुळे चालू वर्षी येसुगडे यांच्या शेतात बायोफिट च्या वापरामुळे द्राक्ष पिकाची प्रतिरोध क्षमता वाढली तसेच यांचा रासायनिक औषधावरील खर्च कमी झाला.