logo
back-arrow
श्री इलियाझ अली,
दक्षिण दिनाजपुर, पश्चिम बंगाल.
 
माश्यांचा प्रकार : रोहू, मीगल कार्प (मेरिक) तसेच कटला
एकूण क्षेत्र : 1.12 एकर
display-image
श्री. इलियाझ अली हे आपल्या 1.12 एकर मत्स्यशेतीमध्ये रोहू, मीगल कार्प (मेरिक) तसेच कटला या माश्यांच्या उत्पादनाचे काम करतात. माशांची कमी प्रमाणात व सावकाश वाढ ही इलियाझ अली यांच्यासमोरची खूप मोठी समस्या होती. म्हणून त्यांनी मागील 45 दिवसांपासून बायोफिट अ‍ॅक्वा उत्पादनांचा वापर आपल्या मत्स्यशेतीकरिता सुरु केला आहे.
साधारणपणे माश्याचे वजन 500 ग्राम पर्यंत होण्यासाठी 60 ते 65 दिवस लागतात असा त्यांचा अनुभव होता, परंतु त्यांनी बायोफिट अ‍ॅक्वाचा वापर केल्या नंतर 40 ते 45 दिवसांत त्यांना माश्यांचे वजन 500 ते 600 ग्राम पर्यंत मिळण्यास मदत झाली. तसेच 500 ग्राम वजनाचे मासे तर 40-45 दिवसात 1500 ग्राम पर्यंत झाल्याचे अली यांनी सांगितले.

प्रथम त्यांनी बायोफिट अ‍ॅक्वा क्लिअर या उत्पादनाचा वापर 1 किलो प्रति एकर प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने 3 वेळा केला. तसेच त्यांनी बायोफिट अ‍ॅक्वा कल्चर या उत्पादनाचा वापर 1 लिटर प्रति एकर या प्रमाणात 2 वेळा केला आणि बायोफिट अ‍ॅक्वा फीड कॉन्सन्ट्रेट चा वापर मत्स्यखाद्या बरोबर 10 ग्रॅम प्रति किलो खाद्य या प्रमाणात केला.
पूर्वीची मत्स्यशेती आणि बायोफिट अ‍ॅक्वा मत्स्यशेती यांमधील फरक-
पूर्वीची मत्स्यशेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकर : रु. 12 ते 15 हजार
  • सरासरी उत्पादन : 2-3 क्विंटल
  • बाजारभाव : रु. 100-120 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति 1 एकर : रु. 20,000-25,000
बायोफिट अ‍ॅक्वा मत्स्यशेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकर : रु. 6 ते 7 हजार
  • सरासरी उत्पादन : 4.5 ते 5 क्विंटल
  • बाजारभाव : रु. 150 ते 170 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति 1 एकर : रु. 60 ते 70 हजार
बायोफिट अ‍ॅक्वा क्लिअरच्या वापरामुळे तलावाच्या पाण्यातील हानिकारक अमोनियायुक्त घटकांचे प्रमाण कमी झाले तसेच पाण्यातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत झाली. बायोफिट अ‍ॅक्वा कल्चरमुळे पाण्यातील गढूळपणाची समस्या दूर होऊन, जैविक घटकांचे योग्य विघटन झाले. माश्यांची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत मिळाली. बायोफिट अ‍ॅक्वा फीड कॉन्सन्ट्रेट मुळे माश्यांच्या शरीरातील प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघाली व माश्यांचे वजन वाढले, परिणामी गेल्या 45 दिवसात इलियाझ अली यांना त्यांच्या मत्स्यशेतीत खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.